बीएसस्सी परीक्षेत उज्ज्वल इंगळे नारखेडे महाविद्यालयात प्रथम
भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बीएससी संगणक विषयात 2021 मध्ये उज्ज्वल सुनील इंगळे या विद्यार्थ्याने एन.के.नारखेडे महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथम आला व विद्यापीठातून तिसरा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती पाटील तसेच प्राचार्य यांनी उज्ज्वल इंगळे यास मार्गदर्शन केले. उज्ज्वल इंगळे हा भुसावळ येथील रेल्वे पोलिसातील सहाय्यक फौजदार सुनील इंगळे यांचा मुलगा आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल नातेवाईक व मित्र परीवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

