कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून करावेत


जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या तिमाही ऑनलाईन बैठकीत ठराव संमत

भुसावळ : जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची तिमाही ऑनलाईन बैठक जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून करण्यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला. राष्ट्रीय ग्रुप बँकेतून पगारदार सभासदांचे जोखीम व विमा संरक्षण स्वीकारले जाते सोबत अनेक सुविधा उपलब्ध असून याउलट जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पगार होतात परंतु आकस्मिक घटनेची जोखीम तथा विमा संरक्षण मिळत नाही आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

…तर उच्च माध्यमिक परीक्षेवर बहिष्कार
थकित वैद्यकीय बिलाच्या बाबतीत शासनाने तत्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे, घोषीत-अघोषित केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांना 20 टक्के अनुदानाचा टप्पा देऊन तत्काळ अनुदानावर आणावे व निर्णयाची अंमलबजावणी करावी, अन्यथा अनुदानीत तत्त्वावर काम करणारे शिक्षक प्राध्यापकदेखील उच्च माध्यमिक परीक्षेवर बहिष्कार टाकतील, असा इशारा देण्यात आला. ज्या शिक्षकांची मान्यता आहे अशा शिक्षकांना शालार्थ क्रमांक तात्काळ उपलब्ध करून द्यावा. त्याच बरोबर 2013 ते 2020 पर्यंत मान्यता प्राप्त झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे थकित वेतन तत्काळ अदा करावे तसेच वाढीव पायाभूत पदांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी वरील विषयांवर सांगोपांग चर्चेत जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव शैलेश राणे व कार्याध्यक्ष नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनीलजी गरुड यांनी सहभाग घेत असताना विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा केली. या चर्चेत प्रा.डी.डी.पाटील उपाध्यक्ष, प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.राजेश बडगुजर, प्रा.शरद पाटील, प्रा.अतुल इंगळे, प्रा.राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य प्रा.संजय चौधरी, प्रा.धनराज भारुडे तसेच महिला प्रतिनिधी प्रा.स्मिता जयकर, प्रा.मनीषा देशमुख, प्रा.भारती महाजन व क्रीडा प्रतिनिधी प्रा.मनोज वारके उपस्थित होते. आभार कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !