सामाजिक तेढ निर्माण करणार्या वसीम रीजवीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी
भुसावळातील विविध संघटनांतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
भुसावळ : मुस्लीम धर्माच्या पवित्र कुराण शरीफबद्दल वादग्रस्त जनहित याचिका दाखल करणार्या वसीम रीजवीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. रीजवी यांनी यापूर्वीदेखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचे उदाहरण आहे. लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रयत्न असून अशा सामाजिक तेढ निर्माण करणार्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
मुस्लीम समाज मंचचे निवेदन
मुस्लीम समाज मंचने प्रांताधिकारी प्रशासनाला माजी नगरसेवक साबीर शेख यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. या निवेदनावर अब्दुल हकीम खान, रेहान रजा, फहेद शेख, जूनेद खान, साजीद बागवान, अॅड.अहतेशाम मलिक, शेख नदीम शेख मन्वर, इम्रान खान इद्रीस खान, जहीर शेख, जुनेर अशरफ खान, डॉ.इम्रान खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीचेही निवेदन
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक तहसील प्रशासन तसेच राष्ट्रपतींना निवेदन पाठवले आहे. वसीम रीजवी याने संपूर्ण देशातील व जगातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, शहराध्यक्ष लीम गवळी, युवक अध्यक्ष इम्रान खान, शहर सचिव शे.हमीद सर, अन्वर तडवी, जॉनी गवळी, इसाक चौधरी, शोएब गवळी, महिला शहर उपाध्यक्ष हमीदा गवळी, मो.फरफान शेख, शेख तन्वीर शेख बाळू, महिला अध्यक्ष यास्मीन बानो आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
