कोरोना सुसाट ! : सहा रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 956 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 72 हजार 575 वर : एकाच दिवसात 709 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 956 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1455 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 72 हजार 575 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 63 हजार 27 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 709 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 341
जळगाव ग्रामीण 48
भुसावळ 117
अमळनेर 24
चोपडा 106
पाचोरा 32
भडगाव 32
धरणगाव 58
यावल 24
एरंडोल 18
जामनेर 72
रावेर 01
पारोळा 06
चाळीसगाव 46
मुक्ताईनगर 25
बोदवड 00
अन्य जिल्हा 06


24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 72 वर्षीय पुरूष व 68 वर्षीय महिला, यावल तालुक्यातील 71 वर्षीय पुरूष, धरणगाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष, मुक्ताईनगर तालुक्यातील 73 वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. यातील एक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव तसेच दोन मृत्यू उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, एक मृत्यू मानस हॉस्पीटल, जळगाव व एक मृत्यू अश्‍विनी हॉस्पीटल, जळगाव तसेच एक मृत्यू चोपडा येथे झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !