रस्त्यांची कामे तत्काळ करा : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
बोदवड : शहरातील शासकीय विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली. तालुक्यातील मंजूर रस्त्यांची चाळण होऊन नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसोबत तडकीफडकी बैठक घेण्यात आली. कामांत दिरंगाई करणार्या कंत्राटदाराकडून कामे काढून ते दुसर्या कंत्राटदारास देण्याचे आदेश दिले. सबकॉन्ट्रँक्टर न नेमता संबंधित ठेकेदाराने कामे करावे, यावर अभियंत्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. कामांचा दोन दिवसांत आढावा घेणार असून हलगर्जीपणा दिसल्यास प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
रस्त्यांची कार्मे व्हावीत दर्जेदार
विचवा ते बोदवड रस्त्यावरील खड्डे मुरुमाच्या सहाय्याने बुजविले जात असून डांबरमिश्रीत खडीने बुजविण्यात यावे तसेच मलकापूर चौफुल्ली ते घाणखेडपर्यंतचे काम संबंधित ठेकेदाराकडून काढून घेण्यात यावे व ते दुसर्या कंत्राटदारास द्यावे, सब कॉन्ट्रक्टर काम करणार नाही यावर अभियंत्यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना आमदारांनी केल्या. मलकापूर चौफुली ते पाटील पेट्रोल पंपापर्यंत 700 मीटर काँक्रीटीकरणासाठी नव्याने पाच कोटी मंजूर केले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदिस्त गटारी व अमर हॉटेलपासून दीड किमी पर्यंत लँम्प लावण्यात येतील तसेच सब कॉन्ट्रक्टर काम करणार नाही, अशी तंबी आमदारांनी दिली.

यांची बैठकीला उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत कार्यकारी उत्तर विभाग अभियंता इमरान शेख, उप अभियंता प्रवीण बेंडकूळे, शाखा अभियंता किरण धनके तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक कलिम शेख, शहरप्रमुख संजय माळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, माजी उपजिल्हा प्रमुख विनोद पाडर, विभाग प्रमुख गोपाळ पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, विनोद मोरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी, गजानन पाटील, नईम खान, पवन माळी, मनोज पाटील, भूषण भोई, सचिन भोई, योगेश भोई, निलेश माळी, अप्पू भांजा, आनंदराज खोडके, अमोल व्यवहारे आदी पदाधिकारी तसेच शिवसैनिक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
