अकलूदच्या पोलिस पाटलांचे प्रांताधिकार्यांकडून निलंबन
यावल तहसील कार्यालयातील धिंगाणा भोवला
यावल : तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटलासह दोघांनी अंमली पदार्थाचे सेवन करून सोमवार, 15 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात धिंगाणा घातल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकलूदचे पोलिस पाटील किरण मुरलिधर वानखेडे व दीपक झाल्टे यांनी लग्न सोहळ्यास परवानगीवरून तहसील कार्यालयातील कर्मचार्यांशी वाद घालत कार्यालयात धिंगाणा घातल्याची घटना घडली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे अहवाल पाठवल्याने त्याची दखल घेत प्रांताधिकार्यांनी अकलूद पोलिस पाटील यांना गुरुवार, 18 रोजी निलंबीत केल्याने खळबळ उडाली आहे.

