मुक्ताईनगरात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून कोरोनाचा आढावा


मुक्ताईनगर : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शुक्रवारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक गटविकस अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात येवून आढावा घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तालुक्यात पाहणी केली. तहसीलच्या बैठकीत कोरणा विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव होऊ नये यावर उपायोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच कोरोना रुग्णांवर होणारा औषधोपचार व विलगीकरण व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन पुरवठा यावरदेखील चर्चा झाली तसेच उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्षात व कोरोणा लसीकरण केंद्रात भेट देऊन रुग्णांची चर्चा करून उपचार याबाबत विचारणा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक योगेश राणे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी राजकुमार जैन, मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, किरण बावस्कर व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. मुक्ताईनगर व चांगदेव भागातील कोरोणा प्रतिबंधीत क्षेत्रांची पाहणी करून तेथील रुग्णांची वैद्यकीय उपचार याबाबत चर्चा करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना उपाययोजना करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी सूचना केल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !