रावेरात शासकीय हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन


रावेर : केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेत नाफेड अंतर्गत हरभरा या धान्याचे शासकीय खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. खरेदी-विक्री संघामार्फत रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हरभर्‍याची खरेदी केली जाणार आहे. रावेर खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार चौधरी यांच्या हस्ते काटापूजन व पहिल्या शेतकर्‍यांचा सत्कार करून खरेदीला प्रारंभ झाला. दोन हजार 516 शेतकर्‍यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, चेअरमन पी.आर.पाटील, व्हा.चेअरमन किशोर पाटील, निलेश चौधरी, मॅनेजर विनोद चौधरी, शेतकरी भाऊराव पाटील, ग्रेडर प्रशांत पाटील, राजू सवर्णे आदी उपस्थित होते.. हरभर्‍यासाठी शासनाने हमीभाव पाच हजार 100 रुपये जाहीर केला असून 24 एप्रिलपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !