पाणी समस्या सुटल्याने नागरीकांनी व्यक्त केले समाधान


भुसावळ : शहरातील साधना नगरासह सुरभी नगरातील काही भागात गेल्या चार महिन्यांपासून नळांना पाणी येत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती शिवाय यामुळे महिलावर्गाचे भर उन्हाळ्यात चांगलेच होत होते. या संदर्भात नागरीकांनी पाणीपुरवठा सभापती नगरसेवक किरण कोलते यांना समस्या सोडवण्याची मागणी केल्यानंतर कोलते यांनी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता त्या भागातील लोकांना नवीन पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करून दिल्याने नागरीकांची पाण्यासाठीची वणवण थांबली असून त्यांनी कोलते यांचे आभार मानले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !