धक्कादायक ! सात रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 921 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 75 हजार 415 वर : एकाच दिवसात 504 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 921 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1474 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार 415 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 64 हजार 718 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 504 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 270
जळगाव ग्रामीण 63
भुसावळ 32
अमळनेर 00
चोपडा 181
पाचोरा 19
भडगाव 12
धरणगाव 61
यावल 18
एरंडोल 122
जामनेर 67
रावेर 05
पारोळा 24
चाळीसगाव 43
मुक्ताईनगर 02
बोदवड 01
अन्य जिल्हा 01

