भाजीपाला व मच्छी मार्केटची स्वतंत्र करावी उभारणी


बोदवड शहरात शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांची नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी

बोडवड : शहर व परीसरातील नागरीक व व्यापारी यांच्या अडचणी लक्षात घेता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व परीरात व्यापारी तसेच शेतकरी आपला भाजीपाला विक्रीला येत असलेतरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करण्यासाठी स्वतंत्र भाजीपाला मार्केटची निर्मिती करावी तसेच मच्छी व्यापार्‍यांनादेखील स्वतंत्रव्यवस्था करावी व वाचकांची भूक भागवण्यासाठी स्वतंत्र लायब्ररीची निर्मिती करावी, अशी मागणी बोदवड शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी केली आहे.

तर वाचकांनाही मिळणार दिलासा
बोदवड शहरात सार्वजनिक वाचनालय होते मात्र मंदिराचे बांधकाम केल्यामुळे येथील वाचनालय ग्रामपंचायत काळात स्थलांतरीत करण्यात आले. आज रोजी सार्वजनिक वाचनालयाचे अस्तित्व संपले असून शहरात नव्याने वाचनालयाची नवीन वस्तूची निर्मिती करून सर्व सुविधायुक्त वाचनालयाचे बांधकाम करण्यात आल्यास तरुणांसह वाचकप्रेमींना सोयीचे होणार आहे. शिवाय भाजीपाला मार्केट ,मच्छि मार्केट यामुळे नगरपंचायतला कर उपलब्ध होण्यासदेखील मोठी मदत होणार आहे. सर्व अत्यावश्यक गरजांचा विचार करून पुढील निर्णय तत्काळ घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख गजानन खोडके, अल्पसंख्यांक जिल्हाउपप्रमुख कलीम शोख, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, विभाग प्रमुख गोपाल पाटील, विनोद पाडर, आनंदा पाटील, सुनील बोरसे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख अय्युब कुरेशी, अल्पसंख्यांक शहरप्रमुख शेख शकील, समीर शेख, नईम खान बागवान, गजानन भाई, मुकेश भोई, देवनन भोई, सुनील बैदे, किशोर भोई, पावन माळी, सचिन भोई, आकाश भोई, प्रभाकर धनगर, भगवान माळी, समशेर शेख, सपीक पटावे, लक्ष्मण साठे, बालाजी माळी, लेखन घाटे, युवराज सूर्यवंशी, रवींद्र माळी, संजय माळी, रोहित पवार, राजू चौधरी, धनराज माळी, सुनील गोंधळी, मॅनेज पाटील, गजानन घाटे, कृष्णा घाटे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !