अरे देवा ! आठ रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 971 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 76 हजार 386 वर : एकाच दिवसात 752 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात आठ रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 971 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1484 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 76 हजार 386 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 65 हजार 470 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात 752 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शनिवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 195
जळगाव ग्रामीण 09
भुसावळ 52
अमळनेर 25
चोपडा 266
पाचोरा 16
भडगाव 24
धरणगाव 42
यावल 54
एरंडोल 96
जामनेर 48
रावेर 37
पारोळा 37
चाळीसगाव 63
मुक्ताईनगर 02
बोदवड 01
अन्य जिल्हा 04


24 तासात आठ रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 64 व महिला व 79 वर्षीय पुरुषाचा,
धरणगाव तालुक्यातील 69 वर्षीय पुरुषाचा व 60 वर्षीय महिलेचा, भुसावळ तालुक्यातील 38 वर्षीय पुरूषाचा तसेच चोपडा तालुक्यातील 45 वर्षीय महिलेचा, एरंडोल तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा व पाचोरा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !