वरणगाव शहरातील जनहिताचे प्रलंबित कामे त्वरीत मार्गी लावणार


खासदार रक्षा खडसे : भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट

वरणगाव : शहरातील जनहिताची प्रलंबित विकास कामे तसेच फुलगाव फाटा ते वरणगाव बसस्थानक चौक सर्कल ते साई बाबा मंदिरापर्यंत समांतर महामार्गाचे काम करण्याची मागणी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी यांनी केली आहे. हे काम मार्गी लावण्याचे नहीच्या अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून बसस्थानक ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या प्रलंबित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना खासदार रक्षा खडसे यांनी देत वरणगावातील जनहिताची प्रलंबीत कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही खासदारांनी दिली. भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.

प्रलंबीत कामे मार्गी लावणार
तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचे काम सुरू करा वे तसेच प्रधान मंत्री आवास योजनेचे 104 घरकुलांना नगरपरीषदेने मान्यता दिली असून काम सुद्धा सुरु झाले मात्र केंद्राचा वाटा न मिळाल्याने कामे प्रलंबित होते त्यासाठी 104 मंजूर घरकुलांना 54 लाखां चा निधी केंद्राने वितरीत केल्याने नागरीकांचे अर्धवट राहिलेले काम सुरू होणार आहे तसेच शहरातील दोन अर्धवट गार्डनच्या कामाला निधी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल तसेच भोगावती नदीचे कामाला सुरवात करण्याच्या सूचना यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्या. मनमानी पद्धतीने दीपनगर वीजनिर्मिती केंद्राने भोगावती नदीच्या पात्रातून टाकलेली पाईप लाईन काढण्यात यावी, अशी मागणी शनिवारी वरणगाव येथील भाजप कार्यालयात खासदार खडसे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. खासदारांनी याबाबत पाटबंधारे विभागाला विचारणा करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रसंगी दिले.


यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, गजानन वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष शशी चौधरी, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, एकनाथराव गणपतराव कापसे, प्रकाश मराठे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !