जळगावच्या त्या 27 नगरसेवकांबाबत नाशिक विभागीय आयुक्त घेणार निर्णय !


जळगाव : भाजपाच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावत 27 नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्यानंतर जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली होती. या प्रकरणानंतर भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली. आता या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असून भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत बजावला गेलेला व्हिप, जाहीर व्हिप, नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान, असे अनेक पुरावे या याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !