मुंबई आणि दानापूर तसेच पुणे आणि भागलपूर दरम्यान विशेष अतिरिक्त गाड्या धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई आणि दानापूर तसेच पुणे आणि भागलपूर दरम्यान विशेष अतिरीक्त गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मुंबई-दानापूर विशेष गाडी
01189 मुंबई-दानापूर विशेष गाडी 16 ते 30 एप्रिलदरम्यान सुरू रकण्यात आीली आहे. मुंबई ही गाडी दररोज 12.30 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसर्या दिवशी 6.45 वाजता पोहोचेल. 01190 दानापूर-मुंबई विशेष गाडी 17 एप्रिल ते 1 मे दरम्यान दानापूर येथे 11.30 वाजता सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्या दिवशी 3.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-भागलपूर विशेष गाडी
01445 पुणे-भागलपूर विशेष गाडी 15 ते 29 एप्रिलदरम्यान दररोज धावत आहे. दर गुरुवारी ही गाडी पुणे येथून 8.20 वाजता सुटल्यानंतर भागलपूर येथे तिसर्या दिवशी 09.40 वाजता पोहोचेल. 01446 विशेष गाडी 17 एप्रिल ते 1 मे दरम्यान दर शनिवारी भागलपूर येथून एका वाजता सुटेल व पुणे येथे तिसर्या दिवशी 03.15 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल जं., जमालपूर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
