मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षपदी प्रमोद वाघ तर चोपड्याची धूरा सुनील पाटील यांच्याकडे

राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती


गणेश वाघ
Pramod Wagh appointed as Deputy Superintendent of Police for Muktainagar, while Sunil Patil takes charge of Chopda भुसावळ (24 जून 2026) : राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना शासनाने तात्पुरता पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती प्रदान केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अधिकार्‍यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती आदेशाची प्रतीक्षा होती. शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी मंगळवार, 23 रोजी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.

मुक्ताईनगर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी प्रमोद वाघ तर चोपडा विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघ हे पिंप्री-चिंचवड एसडीपीओ कार्यालयातून तर पाटील हे खंडाळा पीटीएस येथून बदलून येत आहेत.


जळगाव जिल्ह्यातील सायबर सेलचे निरीक्षक सतीश गोराडे यांना पदोन्नतीनंतर सायबर व अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक येथे नियुक्ती मिळाली आहे तर सीटीबी जळगावचे संजय गायकवाड यांना जळगाव मुख्यालयात नियुक्ती मिळाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !