कोरपावली उर्दू शाळा अतिक्रमणाच्या विळख्यात


यावल : तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परीषद उर्दू व मराठी शाळेच्या जागेवर अतिक्रमण धारकांनी केला कब्जा केला आहे. याबाबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या संदर्भात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून शाळेला अतिक्रमणूपासून मुक्त करू, असे सरपंच विलास अडकमोल म्हणाले.

शाळेच्या जागेवर अतिक्रमण
या संदर्भात कोरपावली, ता.यावल येथील जिल्हा परीषद मराठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जुम्मा तडवी, सचिव डी.एस.कोळी, जिल्हा परीषद उर्दू शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद तडवी, सचिव अकील पटेल यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, कोरपावली येथील जिल्हा परीषद मराठी व उर्दु शाळेच्या मागील बाजुस बर्‍याच लोकांनी शाळेच्या जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून त्या ठिकाणी पत्र्यांचे शेड व कुडाच्या झोपड्या बांधल्या आहेत शिवाय त्या ठिकाणी गुरे , ढोर, बैल बांधली जात आहे. शाळेच्या भिंतीला लागुनच गुरा ढोरांचे शेण खत टाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे शाळेच्या परीसरात दुर्गंधीचा त्रास होत असतो यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार त्या अतिक्रमण धारकांना सांगून व सूचनादेवून देखील ती मंडळी ऐकण्यास तयार नाहीत. उलट पक्षी आता या अतिक्रमण धारकांनी त्या ठिकाणी पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे शाळा आवारातील वृक्षांना गावातील मंडळी ही आपली जनावरे बांधतात तसेच आपली ट्रॅक्टर व ट्रॉली आदी वाहने उभी करीत असतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करणार्‍या अतिक्रमण धारकांविरुद्ध आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भातील तक्रार यावल तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !