रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लँटची होणार उभारणी


रावेर : ग्रामीण रुग्णालयात 135 सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होईल एव्हढा ऑक्सिजन जनरेशन प्लँट महिनाभरात उभारण्यात येणार असाहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व सुविधायुक्त डिजिटल ऑपरेशन थिएटरची या ठिकाणी निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी येथे भेटीप्रयंगी दिली. आमदार निधीतून 10 बेडचे आयसीयू कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.दी.महाजन उपस्थित होते.

15 दिवसात जनरेशन प्लांट
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी गुरुवारी येथील ग्रामीण रुग्णालयात डीपीडीसी योजनेतून जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीने सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असल्येल्या अद्यावत ऑपरेशन थिएटर, आयसीयू कक्ष व लेबर रूमची पाहणी केली. याठिकाणी ऑक्सिजनची कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट 15 दिवसांत कार्यान्वित होणार आहे. याबाबत लवकरच ई टेंडर होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात आयसीयू कक्ष उभारण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी पुढाकार घेतला असून यासाठी त्यांच्या आमदार निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. राज्यातील एकमेव अद्यावत व डिजिटल अशा स्वरूपाचे ऑपरेशन थिएटर येथे लवकरच कार्यरत होणार आहे.




उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव
ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी 2017 मध्ये वरीष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला मात्र यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दम्यान रुग्णांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट आल्याचे सांगत बचत गटाला जेवण पुरविण्याचा ठेका देण्यासंदर्भात तहसीलदार उषारानी देवगुणे यांना यावेळी डॉ.चव्हाण यांनी सूचना दिल्या.

भाजपची शुक्रवारी बैठक
दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात आयसीयू कक्ष निर्मितीसाठी भाजपचे पदाधिकारी पुढे सरसावले असून त्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी येथे खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे. या बैठकीत आयसीयू कक्षाच्या निर्मितीसाठी या पदाधिकार्‍यांकडून निधी देण्यासाठी चर्चा होणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !