बोदवडच्या पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी


देशोन्नतीचे बोदवडचे पत्रकार प्रकाश चौधरी यांचे निधन

बोदवड : दैनिक देशोन्नतीचे बोदवड प्रतिनिधी पत्रकार प्रकाश वसंत चौधरी 53) यांचे शुक्रवारी कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासनूची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यांच्या निधनाने बोदवडच्या पत्रकार वर्तुळात हळहळ पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून चौधरी देशोन्नतीचे पत्रकार म्हणून काम करीत होते. बोदवड परिसरातील अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन मुली, जावई असा परीवार आहे.

पत्रकारांना लसीकरण कधी : मनोज बारी
फ्रंट वर्कर असूनही अद्यापही जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना लसीकरण सुरू झालेले नाही. याविषयी प्रत्येक दैनिकाकडून याद्या मागवण्यात आल्या. मात्र त्याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही, असे देशोन्नतीचे जळगाव आवृत्ती संपादक मनोज बारी म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !