बिहारच्या पुजार्याला भुसावळात ‘रेड ट्यूब’ आमिषाने दोन लाखात गंडवले
भुसावळ : राशी भोवती लागलेली साडेसाती संपवण्यासाठी जुन्या रेडिओतील रेड ट्यूब देण्याच्या बहाण्याने बिहारातील पुजार्याला तब्बल एक लाख 90 हजारात गंडवण्यात आल्याची घटना भुसावळात घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील तिघांविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सुबोध संतोषी राय (49, ग्रामीण बँकेजवळ, सोनो, जि.जमुई, बिहार) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दिनेश उर्फ सचिन आत्माराम राठोड, राजू उर्फ राहुल दगडू जाधव, पंकज रतनसिंग चव्हाण, (सर्व रा.मोरझिरा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरुद्ध गुरनं.166/2021, भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.




