भुसावळात धुमस्टाईल वृद्धेची चैन व मंगळसूत्र लांबवले
भुसावळ : रस्त्याने पायी चालत असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची घटना शहरातील कन्हाळा रोड भागातील एकदंत नगर परीसरात शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी 47 हजार 500 रुपयांचा एैवज लांबवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा धूम स्टाईल चोर्या सुरू झाल्याने महिलावर्गात खळबळ उडाली आहे.
शहरात पुन्हा धूम स्टाईल चोरी
शहरातील तुकाराम नगर, माळी भवन परीसरातील रहिवासी कस्तुराबाई काशीनाथ इंगळे (74) हे शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून धूम स्टाईल आलेल्या दुचाकीस्वारांनी काही कळण्याआत त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीची चैन व 22.50 रुपये किंमतीची चौकोणी मनी व रामपान असलेली पोत लांबवली. काही कळण्याआत चोरटे पसार झाले. 18 ते 20 वयोगटातील चोरटे असल्याचे कस्तुराबाई इंगळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या परीसरातील सीसीटीव्ही तसेच वृद्ध महिलेने सांगितलेल्या वर्णनावरुन चोरट्यांचा शोध सुरू आहे. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.



