भुसावळात चोरट्यांचा कहर : मंदिराच्या दानपेटीसह किराणा दुकान फोडले
भुसावळात व्यापारी धास्तावले : दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न
भुसावळ : वाढत्या चोर्यांचा तपास थंडबस्त्यात असताना चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीसह किराणा दुकान फोडून पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिले तर दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
शहरातील जवाहर डेअरी समोरील मारोतीच्या मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील सुमारे आठशे ते हजाराची चिल्लर लांबवली तर त्याच्याच जवळ असलेल्या अशोक आहुजा यांच्या किराणा दुकानात सुध्दा चोरट्यांनी चोरी करून दुकानातील किराण्यासह रोख रक्कम मिळून सुमारे आठ ते 10 हजाराचा सामान लांबवला.
दुकानदारांनी सीसीटीव्ही सुरू करावेत : पोलिस उपअधीक्षक
बाजारपेठे झालेल्या चोरीनंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळाची पाहणी करीत व्यापार्यांची बैठक करीत त्यांच्याशी संवाद साधला तसेच बंद असलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची सूचना केली. बाजारपेठ पोलिसांची गस्त वाढवण्यासह चोरट्यांना लवकरच पकडण्यात येईल, असेही ते म्हणाले.



