वरणगावात प्रतिबंधीत 15 लाखांचा गुटखा जप्त


वरणगाव पोलिसांत दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल : गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ

वरणगाव : महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत असलेला 15 लाखांचा गुटखा वरणगाव पोलिसांनी जप्त करीत दोघांविरुद्ध कारवाई केली. शनिवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्ग सहावरील बाबूराव इंजिनिअर वर्क्स शॉपजवळ ही कारवाई करण्यात आली. हवालदार योगेश पाटील हे बसस्थानक चौकात नाका बंदी कर्तव्यांवर असतांना संशयास्पदरीत्या माल वाहतूक करणारी बोलेरो आढळल्याने त्यांनी ते अडवत तपासणी केली असता सुगंधीत तंबाखूसह गुटखा आढळला. 15 लाखांच्या गुटख्यासह पाच लाखांचे वाहन मिळून 20 लाखांचा मुद्देमाल व दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नाकाबंदीदरम्यान कारवाई
बोलेरो (एम.एच.20 सी.टी.6964) ही गाडी मुक्ताईनगरकडे जात असतांना पोलिस कर्मचारी योगेश पाटील यांनी वाहनाचा सीनेस्टाईल पाठलाग केला. वाहन चालक रीयाज अली लियाकत अली (27) व सोबत सिकंदरकुमार सानी (25, रा.नशिराबाद, ता.जि.जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनात विमल पान मसाल्याच्या 18 गोण्या व सुगंधीत तंबाखुच्या 15 गोण्या आढळून आल्या. ही कारवाई मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, वरणगाव पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश पाटील करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !