वरणगाव फॅक्टरीत युवकाची आत्महत्या
वरणगाव : येथून जवळच असलेल्या ऑयुध निर्माणी वरणगाव वसाहतील युवकाने छताच्या हुकाला दोरी लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. सागर दिनकर सुरवाडे (26) असे मयता युवकाचे नाव आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयत सागर दिनकर सुरवाडे (26, वरणगाव फॅक्टरी, क्वॉटर नंबर 12, टु टाईप) यानपे सकाळी 9 वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. सुकलाल दिनकर सुरवाडे (30, वरणगाव फॅक्टरी) यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहिण असा परीवार आहे. पुढील तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहे.




