यावलच्या पोलिस पाटलांचे कोरोनामुळे निधन : वारसास 50 लाखांचा धनादेश
यावल : कोरोनाच्या कठीण काळातही सेवा बजावून कोरोना योद्धा ठरलेल्या यावलचे पोलिस पाटील यांचे 31 मे 2020 रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना बुधवारी शासनातर्फे 50 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कुटूंबाने मानले शासनाने आभार
यावलचे पोलिस पाटील मिलिंद श्रावण गजरे यांनी कोरोनाच्या कठीण काळातही शासनाची सेवा केली मात्र कोरोनाशी लढताना त्यांचे निधन झाले. शासनाच्या धोरणांतर्गत कोरोना वारसांना राज्य शासनाकडून पन्नास लाख रुपयांचा धनादेश बुधवारी फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग व फैजपूर विभाग विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या हस्ते मयत पोलिस पाटील यांच्या पत्नी मीना मिलिंद गजरे, त्यांचा मुलगा रत्नदीप मिलिंद गजरे व अमरदीप मिलिंद गजरे यांना सूपूर्द करण्यात आला. प्रसंगी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तथा पोलिस पाटील संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व यावल तालुका पोलिस पाटील संघटना अध्यक्ष अशोक पाटील गिरडगाव यांची उपस्थिती होती. धनादेश मिळाल्याने गजरे यांच्या पत्नी व कुटुंबाने राज्य शासनाचे व प्रांताधिकारी कैलास कडलगसह सर्वांचे आभार मानले.



