रेल्वे प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाने 11 रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ : कोरोनामुळे राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने 11 रेल्वे गाड्या 11 मे दरम्यान पर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या गाड्या झाल्या रद्द
ट्रेन क्रमांक 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 10 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02110 मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 10 मे दरम्यान),
ट्रेन क्रमांक 02113 पुणे-नागपूर विशेषच्या फेर्या, (28 एप्रिल ते 10 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02114 नागपूर-पुणे विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 9 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02189 मुंबई-नागपूर विशेषच्या फेर्या (28 एप्रिल ते 11 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -मुंबई विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 10 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02111 मुंबई -अमरावती विशेषच्या फेर्या (28 एप्रिल ते 11 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02112 अमरावती-मुंबई विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 10 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02271 मुंबई-जालना विशेषच्या फेर्या (27 एप्रिल ते 10 मे दरम्यान), ट्रेन क्रमांक 02272 जालना-मुंबई विशेषच्या फेर्या (28 एप्रिल ते 11 मे दरम्यान) रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी बदलाची कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



