वरणगाव समांतर महामार्ग व कठोरा जंक्शनचा प्रश्न मार्गी लावणार


माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांची ग्वाही : प्रकल्प संचालकांनी केली पाहणी

वरणगाव : भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलगाव फाटा ते बस स्थानक चौफुल्ली ते साईबाबा मंदिरापर्यंत दुभाजक व लाईट टाकून वरणगावकरांच्या जनहिताचे समांतर महामार्गचे काम सुरू करावे, कठोरा व रावजी बुवा दरम्यानच्या नवीन बायपास चारपदरी महामार्गावर जंक्शन करावे तसेच फुलगाव येथील रेल्वेगेट सुरू ठेवावे, बायपासच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्ता तयार करावे आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, उपाध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, गजानन वंजारी, भाजपा नेते माजी सभापती राजेंद्र साहेबराव चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, राजकुमार चौधरी यांनी निवेदन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मंत्री आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देण्यात आले.

स्पॉटची केली पाहणी
मंगळवारी आमदार संजय सावकारे, प्रकल्प संचालक सिन्हा यांनी प्रत्यक्ष वरणगाव समांतर महार्गाच्या व कठोरा जंक्शन व फुलगाव रेल्वेगेट सुरू राहिले पाहिजे यासाठी स्थळावर येऊन पाहणी केली. वरणगाव भाजपा ने दिलेल्या निवेदनाची दखल घेत सोमवारी आमदार संजय सावकारे व प्रकल्प संचालक सिन्हा यांनी प्रत्यक्ष स्पॉट वर येऊन पाहणी केली. आमदार संजय सावकारे यांनी कडक भूमिका घेत प्रकल्प संचालक सिन्हा यांना कडक सूचना केल्या तसेच वरणगावकरांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच समांतर महामार्ग, कठोरा रावजी बुवा दरम्यान जंक्शन झालाच पाहिजे, जनतेची गैरसोय व वरणगावकरांवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही, तुम्ही काहीही कारा मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांशी हवं तर बोलतो मात्र फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर दरम्यान समांतर महामार्ग दुभाजक व लाईट टाकून तसेच कठोरा रावजी बुवा दरम्यान जनतेला महामार्गावर चढण्यासाठी जंक्शन तयार झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. प्रकल्प संचालक सिन्हा यांनी यावेळी जनहिताच्या भावनेची दखल घेउन काम मार्गी लावण्याची ग्वाही भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !