ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर : नगरसेवक पिंटू कोठारी


भुसावळातील साईजीवन सुपरशॉपीला चार वर्ष पूर्ण : ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून पुरवल्या नानाविध सुविधा

भुसावळ : विश्‍वास हीच परंपरा मानून ग्राहक हितासाठी सुरू करण्यात आलेल्या भुसावळातील यावल रस्त्यावरील साईजीवन सुपरशॉपी क्रमांक दोनला बुधवारी चार वर्ष पूर्ण झाले असून प्रतिष्ठानने पाचव्या वर्षात यशस्वी पर्दापण केले आहे.

ग्राहकांचा विश्‍वास जोपासला : पिंटू कोठारी
प्रतिष्ठानचे संचालक तथा नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी म्हणाले की, गेल्या चार वर्षांच्या काळात ग्राहकांना सेवा करण्याची संधी मिळाल्याचे निश्‍चित समाधान आहे. लॉकडाऊनच्या काळात साईजीवन नसते तर रेमडेसीवरचा काळाबाजार झाला त्याप्रमाणे 34 रुपयांची साखर अव्वाच्या सेवा दरात निश्‍चितच विकली गेली असती मात्र ग्राहक हित डोळ्यापुढे ठेवून आम्ही ग्राहकांचे हाल होवू दिले नाही व हाच वसा यापुढेदेखील कायम ठेवू. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून त्यांना नानाविध सुविधा प्रयत्न नेहमीच आमचा प्रयत्न राहिला. योग्य त्या दरात शहर व तालुक्यासह परीसरातील तालुक्यात किराणा माल पोहोचण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केला शिवाय कोविडच्या काळात ग्राहकांचे हाल कमी करण्यासाठी आम्ही घरपोच किराणा माल पोहोचवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली. ग्राहकांचा विश्‍वास नेहमीच सार्थ ठरवणार असल्याचे कोठारी म्हणाले.




उपलब्ध सुविधा-
माफक दरात किराणा माल (घरपोच सुविधेची सोय)
घरात लागणार्‍या विविध वस्तू
आकर्षक दरात स्टेशनरी
आकर्षक वस्त्र दालन

पत्ता : साईजीवन सुपरशॉप क्रमांक दोन
सुपर शॉप व पारीवारीक वस्त्रदालन
यावल रोड, भुसावळ, जि.जळगाव



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !