मुक्ताईनगरात घरफोडी : 58 हजारांचा एैवज लंपास
मुक्ताईनगर : कापड व्यावसायीकाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडत घरातील 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने व आठ हजारांची रोकडसह 58 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. 26 ते 27 एप्रिल ही घटना घडली.शहरातील जुने बाजार गल्लीत अमित कांतीलाल जैन (34, रा.जुने बाजार गल्ली) हे कापड विक्री व्यावसायीक राहतात. घर बंद असल्याने चोरट्यांनी लोखंडी कपाटातील आठ हजारांची रोकड व 50 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सादीक पटवे करीत आहे.




