कोरोना : 1125 रुग्णांची कोरोनावर मात : नव्याने 1006 रुग्ण आढळले


24 तासात मात्र 20 रुग्णांचा मृत्यू  : आतापर्यंत 2142 रुग्णांचा एकूण मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 1006 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 20 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 1125 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2142 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 1125 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 19 हजार 934 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख सात हजार 26 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.




मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 173
जळगाव ग्रामीण 47
भुसावळ 130
अमळनेर 60
चोपडा 97
पाचोरा 47
भडगाव 11
धरणगाव 33
यावल 25
एरंडोल 73
जामनेर 38
रावेर 70
पारोळा 20
चाळीसगाव 50
मुक्ताईनगर 90
बोदवड 35
अन्य जिल्हा 07

24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-

भुसावळ शहरातील 54, 67 वर्षीय पुरूषाचा 71 वर्षीय महिलेचा

यावल तालुक्यातील 53 वर्षीय, सहा वर्षीय बालिका व 70 वर्षीय महिला

जळगाव शहरातील 65 वर्षीय व 61 वर्षीय महिला

एरंडोल तालुक्यातील 76 वर्षीय पुरूष व 45 वर्षीय महिला

जामनेर तालुक्यातील 54 व 55 वर्षीय महिला

पाचोरा तालुक्यातील 48 व 60 वर्षीय पुरूष

अमळनेर तालुक्यातील 53 वर्षीय महिला

चाळीसगाव तालुक्यातील 72 वर्षीय महिला

चोपडा तालुक्यातील 48 वर्षीय महिला

जळगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला

पारोळा तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष

रावेर तालुक्यातील 59 वर्षीय महिला

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !