पिंप्रीसेकममध्ये टरबूज चोरी : 15 हजारांच्या टरबूजसह दोघांना अटक


भुसावळ : टरबूज चोरी प्रकरणी विठ्ठल लक्ष्मण तायडे (39, रा.पिप्रीसेकम) व काशिनाथ नथ्थू झाल्टे ( 28, रा.पिप्रीसेकम) यांना तालुका पोलिसांनी अटक केली. पिंपीसेकम येथील सुमारे 55 हजार रुपये किंमतीचे टरबूज चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तपास करीत आरोपींना अटक केली. आरोपींनी 15 हजार रुपये किंमतीचा टरबूजाचा माल पोलिसांना काढून दिला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण, यूनूस शेख, प्रेमचंद सपकाळे आदींनी ही कारवाई केली. अन्य टरबूज कोणाला विकले याची माहिती पोलिसांकडून सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !