कोरोनावर 1103 रुग्णांची मात पुन्हा 1063 रुग्ण आढळले तर 21 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 1063 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 1103 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2163 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 1103 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 20 हजार 997 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख हजार 129 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



गुरुवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 167
जळगाव ग्रामीण 21
भुसावळ 93
अमळनेर 205
चोपडा 90
पाचोरा 47
भडगाव 09
धरणगाव 20
यावल 28
एरंडोल 86
जामनेर 126
रावेर 46
पारोळा 19
चाळीसगाव 74
मुक्ताईनगर 02
बोदवड 23
अन्य जिल्हा 07
24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तब्बल 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-
जळगाव शहरातील 48, 53, 70, 70 वर्षीय पुरूष
मुक्ताईनगर तालुक्यातील 65, 75 वर्षीय पुरूष, 35 व 48 वर्षीय महिला
भुसावळ शहरातील 51, 66 वर्षीय पुरूष व 48 वर्षीय महिला
रावेर शहरातील 65 वर्षीय पुरूष व 50 व 78 वर्षीय महिला
एरंडोल तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष व 59 वर्षीय महिला
जामनेर तालुक्यातील 37 पुरूष व 69 वर्षीय महिला
चाळीसगाव तालुक्यातील 52 वर्षीय महिला
अमळनेर तालुक्यातील 53 वर्षीय महिला
बोदवड तालुक्यातील 65 वर्षीय महिला

