मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंद्यांवर धडक कारवाई


मुक्ताईनगर : नूतन पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी पदभार घेताच वॉश आऊट मोहिम सुरू केली असून अवैध धंदे चालकांचे कारवाईने धाबे दणाणले. भिल्लवाडीत गावठी दारुची निर्मिती करणार्‍या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकत 59 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालासह रसायन व हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला तसेच गावठी दारू नष्ट करीत संशयीत आरोपी राजेश बोदडे यास ताब्यात घेतले. बुधवार, 28 एप्रिल दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक लांवड यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार ,पोलिस उपनिरिक्षक निलेश सोळुंके, हवालदार गणेश मनोरे, गणेश चौधरी, संतोष नागरे, देवसिंग तायडे, मंगल साळुंखे, नितीन चौधरी, संभाजी बिजागरे, कांतीलाल केदारे, गोपीचंद सोनवणे, होमगार्ड देवेंद्र काटे, भूषण खडसे, निलेश घुले, अनिल शिंदे, सुशिला पाटील, सुनंदा भोई, वंदना जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !