रावेरात अल्प लसींच्या पुरवठ्याने नागरीक झाले संतप्त


रावेर  : लस घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरीकांनी गर्दी केल्यानंतर कर्मचारी व नागरीकात चांगलाच वाद उद्भवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शुक्रवारी सकाळी लस प्राप्त होण्याची माहिती मिळताच सकाळपासून नागरीकांनी नंबर लावले. सकाळी साडे दहा वाजेपर्यंत लस उपलब्ध झाली नसल्याने नागरीक ताटकळत उभे होते. सुमारे 500 नागरीक लस घेण्यासाठी उपस्थित असताना केवळ 150 डोसचा पुरवठा करण्यात आला होता.

न्यायाधीशांनी केल्या सूचना
दिवाणी न्यायालयाचे न्या.आर.एल.राठोड हे लस घेण्यासाठी येथे आले असता मोठी गर्दी दिसल्याने तसेच सुविधांचा अभाव दिसल्याने त्यांनी तत्काळ या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी मंडप, बसण्यासाठी बाक या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच गर्दी होऊ नये यासाठी नोंदणी व लस देणारे कर्मचारी वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक उपस्थित होते. लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी शनिवारपासून या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !