उपनिरीक्षक दिलीप माळी यांना सहा.पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती


धुळे : शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक यांना सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. माळी यांनी धुळे शहर वाहतूक शाखेत तसेच आझादनगर पोलिस ठाणे, मोहाडी पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे सन 2017 मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. पोलिस दलातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांच्यावर पोलिस दलासह, मित्र परीवार तसेच आप्तेष्टांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !