रावेर तहसीलला कोरोना निधीचा प्रतीक्षा


रावेर : कोरोना व्हायरस संदर्भात शासनाने गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला खर्च करायला 16 लाख रुपये दिले होते. यावर्षी सुध्दा कोरोना व्हायरसची दुसरी लाट असून लॉकडाऊन लावण्यात आले आहे परंतु यावर्षी शासना कडून कोरोना संदर्भात निधी मिळालेला नाही. गतवर्षी रावेर तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात खर्च करण्यासाठी 16 लाख रुपये आले होते. यामध्ये रावेर तहसील प्रशासनाने रुग्णवाहिका भाडे, डिझेल, जेवण व इतर बाबींवर 16 लाख रुपये खर्च केले होते परंतु यावर्षीदेखील कोरोनाची दुसरी लाट असून तहसील प्रशासनाला कोरोना संदर्भात कोणताही निधी अद्याप मिळालेला नाही.

मागील वर्षाचा निधी पूर्ण खर्च : तहसीलदार
गतवर्षी शासनाकडून मिळालेला 16 लाख रुपये पूर्ण खर्च रुग्णवाहिका भाडे, डिझेल, जेवण व इतर बाबींवर खर्च झाला आहे. यावर्षी अद्याप कोरोना संदर्भात निधी मिळाला नसल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !