दुचाकी अपघात : पिता-पुत्राचा मृत्यू


धुळे : काररने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात पिता-पूत्राचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी लळिंगजवळील गतिरोधकाजवळ अपघात झाला. अपघातातील आईसह दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळ्यातील नॅशनल उर्दू हायस्कूलजवळ राहणारे इम्रान मोहम्मद गुरफान अन्सारी (40), त्यांची पत्नी सायमा इम्रान अन्सारी (32), मुलगा साद (06) आणि दोन मुली सारिया (11) सहारा (15) हे पाच जण धुळे येथून दुचाकीे (क्र.एम.एच.41 यू.9064) ने मालेगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना लळिंग गावानजीक कार (क्र. एमएच 04 डीबी 8184) ने दुचाकीला धडक दिली. शनिवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास इम्रान अन्सारी यांचा तर रविवारी सकाळी साद अन्सारी या बालकाचा मृत्यू झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !