मुलीसह दांपत्याची ‘तापी’ पात्रात आत्महत्या


दोघांचे मृतदेह सापडले : पत्नी अद्यापही बेपत्ता

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील दभाशी येथे तापी नदी पात्रात मंगळवारी सकाळी उडी घेऊन मुलीसह दाम्पत्याने उडी घेतली. या घटनेत मुलीसह पित्याचा मृतदेह आढळला तर महिला मात्र बेपत्ता आहे. मयत भोद, ता.धरणगाव येथील देसले परिवारातील सदस्य आहेत. राजेंद्र रायभान देसले (53) व त्यांची कन्या ज्ञानल (20) यांचा रात्री उशिरा मृतदेहाची लागला तर वंदना रायभान देसले (43) यांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. राजेंद्र देसले हे पत्नी व लेकीसह सोमवारी अमळनेर तालुक्यातील नातलगाकडे गेले होते. दुपारनंतर घरी निघतो, असे सांगत तिघांनी शिरपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला मात्र ते घरी पोहोचले नाहीत. मंगळवारी रात्री देसले कुटुंबाची कार दभाशी पुलावर असल्याची बातमी आली आणि घटना उघड झाली. मयत राजेंद्र हे तालुका भाजपाचे माजी उपाध्यक्ष तर ते एरंडोल शेतकी संघाचे संचालक होत. दाम्पत्याने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण कळू शकले नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !