गुटखा तस्करी रोखली : पाच लाखांचा गुटखा जप्त
धुळे : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर 27 मे रोजी रात्री पथकाने तालुक्यातील पळासनेरजवळ कारवाई करत वाहनासह पाच लाख 37 हजार 720 रुपयांचा गुटखा जप्त करीत चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बावस्कर यांनी 28 मे रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून जयकुमार जैनविरुध्द अन्न सुरक्षा कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


