मद्यपी पतीने चारीत्र्यावर संशय घेत पत्नीचा केला खून


साक्री : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिचा खून करण्यात आल्याचे तालुक्यातील बारीपाडा येथे घडली. आईच्या खून प्रकरणी मुलाने फिर्याद दिल्यावरून आरोपीस अटक करण्यात आली. कमलबाई वसंत चौधरी असे ून झालेल्या पत्नीचे नाव असून आरोपी वसंत राजाराम चौधरी (48) यास अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उभयंतांमध्ये भांडण झाल्यानंतर आरोपी पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे घटनास्थळी दाखल झाले. जिभाऊ वसंत चौधरी (रा. बारीपाडा) याने पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी वसंत राजाराम चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !