कर्तव्यात कसूर : भुसावळ नगराध्यक्षांना बडतर्फ करा


सत्ताधारी नगरसेवकांची तक्रार : सहा महिने उलटूनही नाही पालिकेची सभा

भुसावळ : पालिका सर्वसाधारण सभा दर दोन महिन्यांंनी घेणे बंधनकारक असतानाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सहा महिने उलटूनही सभा न घेतल्याने त्यांनी कर्तव्यात कसुरी केल्याने त्यांना पदावरुन बडतर्फ करावे, अशी मागणी सत्ताधारी गटाचे नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केल्याने पालिकेच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली. पालिका निवडणूक उंबरठ्यावर असतानाच सत्ताधार्‍यांमध्ये बेबनाव असल्याचे दिसून येत असल्याने काय-काय रंजक घडामोडी घडतात? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

सभा न घेणे म्हणजेच कर्तव्यात कसूर : पिंटू ठाकूर
नगरविकास विभागाकडे नगरसेवक पिंटू ठाकरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र नगरपालिका कायदा 1965 चे कलम 81 (1) नुसार नगरपालिका सर्वसाधारण सभा दर दोन महिन्यांनी घेणे हे नगराध्यक्षांचे कर्तव्य आहे. तसेच कलम 55 (अ) नुसार अशी सभा न घेतल्यास म्हणजे नगराध्यक्षांनी कर्तव्यास कसूर केल्यास त्यांना आपल्या पदावरुन हटवता येते. पालिकेची गेली सर्वसाधारण सभा 27 नोव्हेबर 2020 रोजी झाली होती. यानंतर नगराध्यक्षांनी आजपर्यंत सर्वसाधारण सभा घेतली नाही. यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केला असल्याने कायद्याच्या तरतुदीचा भंग केला असून त्यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष या पदावरून काढून टाकावे अर्थात बडतर्फ करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

कोरोनामुळे सभा लांबली : नगराध्यक्ष
कोरोनाचा कठीण काळ सुरू असल्याने सभा घेण्यास काहीसा उशीर झाला मात्र आता लवकरच सभा घेण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !