विहिर अनुदानासाठी 30 हजार लाचेची मागणी : जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Demand for ₹30,000 bribe for well subsidy: Contractual technical assistant from Jamner Panchayat Samiti caught in Jalgaon ACB trap. भुसावळ (22 जून 2026) : विहिर अनुदानासाठी 30 हजारांची लाच मागणी करणार्‍या जामनेर पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) सागर अशोक न्हावकर (32, गणपती नगर, तळेगाव, ता.जामनेर) याला सिंचन जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वीच 30 हजारांची लाच रोजगार सेवकामार्फत स्वीकारली मात्र लाचेची हाव संपत नसल्याने तक्रारदाराने तक्रार नोंदवली मात्र आरोपीला संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली तर एसीबीला लाच मागणीचा अहवाल येताच सोमवारी कारवाई करण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार शेतकर्‍याची जामनेर शिवारात शेती आहे. सन 2021-22 व 2022-23 या वर्षात पंचायत समिती, जामनेर यांच्या माध्यमातून सिंचन विहीर मंजूर झाली होती. प्रस्तावीत विहिरीची पाहणी करण्यापूर्वीच न्हावकर याने रोजगार सेवकाच्या माध्यमातून 30 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप तर तक्रारदाराला पंचायत समितीकडून 60 हजार 966 रुपये अनुदान मिळाले होते. उर्वरित अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी नाककर यांनी पुन्हा 30 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार 6 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली.

तीन वेळा लाचेची पडताळणी
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मंजूर झालेल्या विहिरीचे ठिकाण बदलल्याने पुढील अनुदान मिळणार नाही. जर अनुदान हवे असेल, तर 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून न्हावकर लाच मागत होते व तक्रारीअंती एसीबीने लाच पडताळणी 6 एप्रिल, 9 एप्रिल आणि 14 मे 2026 रोजी केली व पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र ट्रॅप आल्याचा संशय आल्याने न्हावकर यांनी लाच स्वीकारली नाही व सोमवारी लाच मागणीचा अहवाल येताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, राकेश दुसाने, प्रदीप पोळ, भूषण पाटील आदींनी केली.

लाचखोरांविरोधात एसीबीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी किंवा लोकसेवक कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबी कार्यालयाशी 0257-2235477 संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवावी.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !