वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू


शिरपुर : शेतात वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तालुक्यातील आढे परीसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. गोपीचंद सुकलाल सनेर (55, रा.ताजपुरी, ता.शिरपूर) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आढे शिवारातील शेतात पिंकाना पाणी भरत असताना विजांचा कडकडाट होवून वीज कोसळली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !