लाचखोर कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


सोयगाव : कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकार्‍यास दोन हजारांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने अटक केली. राहुल श्रीरंग पवार (35) असे अटकेतील आरोपी अधिकार्‍याचे नाव आहे. मनरेगाच्या संकेतस्थळावर अनुदान देयक नोंदविण्यासाठी आरोपीने लाच मागितली होती. एसीबीने शुक्रवारी सोयगाव पंचायत समिती कार्यालयात सापळा रचल्यानंतर आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, सुनील पाटील, केवलसिंग घुसिंगे, विलास चव्हाण चालक चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !