चोरट्यांचा पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
औरंगाबाद : घराच्या हॉलचा दरवाजा उघडा असल्याची संधी चोरट्यांनी साधत दागिने असलेली बॅग लांबवल्याने खळबळ उडाली. सिडको एन 2 मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश कोंडू तायडे (62) यांच्या घरातून चोरट्यांनी चार लाख 96 हजार 423 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग लांबवल्याने खळबळ उडाली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, तायडे यांच्या घरातून दागिन्यांची बॅग चोरून नेणारी संशयित महिला एन 2 येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाली आहे. या कॅमेर्याचे फुटेज पाहून पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला आहे.


