अमळथे तलाठ्यासह पंटरची कोठडीत रवानगी


धुळे : भावंडामधील वाटणी प्रकरण शिंदखेडा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्‍या अमळथे तलाठ्यासह पंटरला धुळे एसीबीच्या पथकाने शिंदखेडा तहसील आवारात लाच स्वीकारताच मंगळवारी अटक केली होती. संशयीत आरोपींना बुधवारी दुपारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तलाठी नवनीत खंडेराव पाटील (32, रा.शिरपूर, जि.धुळे) व खाजगी पंटर संतोष रमेश भदाणे (36, अमळथे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

वाटणी प्रकरणासाठी मागितली होती लाच
44 वर्षीय तक्रारदार यांची मौजे आच्छी येथील आई व वडीलांचे नावे असलेल्या शेत जमिनीचे तक्रारदार यांच्या भावंडांमध्ये वाटणी प्रकरण तयार करून तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे प्रकरण पाठवण्यासाठी आरोपी तलाठी नवनीत पाटील यांनी 15 रोजी 40 हजारांची लाच मागितली होती तर 25 हजारात तडजोड करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर सापळा रचून दोघांना शिंदखेडा तहसीलच्या आवारात पकडण्यात आले. दरम्यान, आरोपींना बुधवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण व सहकारी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !