एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक


मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात रडारवर असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या मुंबईतील अंधेरी परीसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी पहाटे छापे टाकलेतर शर्मा याला लोणावळ्यातील रीसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आले व सहा तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शेलार, यादव यांनी चौकशीदरम्यान प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले होते.

या कारणांमुळे केली अटक
स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये शर्मा यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.

सर्वाधिक एन्काऊंटचा रेकॉर्ड शर्मा यांच्याच नावावर
1983 साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहिम ही दोन पोलीस ठाणी वगळता बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांच्याच नावावर आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !