भाजपा संघटन कार्याला गती द्यावी : खासदार रक्षा खडसे
सावदा : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटन कार्याला गती द्यावी व भारतीय जनता पार्टीची मजबूत फळी उभी करून व्यापक जनहिताचे कार्य करावे, असे आवाहन भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी येथे केले. भारतीय जनता पार्टी सावदा शहराची विस्तृत बैठक संकल्प सिद्ध श्री गणेश मंदिरात खासदारांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व रावेर तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झाली. शहराध्यक्ष पराग पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंदू महाजन यांनी कार्यकर्त्यांना वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून पक्ष वाढीचा संदेश दिला तर डॉ.अतुल सरोदे म्हणाले की, समर्पित वृत्तीने व निष्ठेने पक्षाचे कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये भवितव्य आहे. एकेकाळी चहा विकणारे आज देशाचे पंतप्रधानपदी आहेत साधे नगरसेवक असणारे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतात हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडते, असेही ते म्हणाले.
यांची बैठकीला उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष सुरेश धनके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, डॉ.अतुल सरोदे, नगराध्यक्षा अनिता येवले, शिवाजीराव पाटील, सी.एस.पाटील, महेश चौधरी, रेखा बोंडे, सारीका चव्हाण, नेहा गाजरे, रंजना भारंबे, करुणा पाटील, लीना चौधरी, अजय भारंबे, राजेंद्र चौधरी, अतुल ओवे, अतुल नेहेते, जितेंद्र गाजरे, हरीष इंगळे, महेश अकोले, संतोष परदेशी, गजानन भार्गव, अक्षय सरोदे, लतेश चौधरी, विजय पाटील, सागर चौधरी, भारत चव्हाण, प्रतीक भारंबे, लतेश सरोदे, सचिन बर्हाटे, राकेशकुमार पाटील, भाजपा सरचिटणीस कमलेश भारंबे, राजकिरण बेंडाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष पराग पाटील तर आभार महेश अकोले यांनी मानले.

