संतापजनक : मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार : पतीसह दोघांना अटक
नवी दिल्ली : अपत्य होत नसल्याने पतीनेच पत्नीला मांत्रिकाचा हवाली केल्याची संतापजनक घटना मेरठमध्ये उघडकीस आली. पोलिसांनी मांत्रिकासह पतीला बेड्या ठोकल्या आहेत. मेरठमधील फैयाज अली भागातील ही घटना घडली. संशयीत आरोपी ताहीरला लग्नाच्या दोन वर्षानंतरही अपत्य होत नसल्याने त्याने तांत्रिक असलेल्या ईस्माइलला ही बाब सांगितली व तांत्रिकाने तंत्र-मंत्राचा ड्रामा करीत विवाहितेवर अत्याचार केला. ही घटना घडताना विवाहितेने पतीला मदतीसाठी हाक दिली मात्र त्याने निर्लज्जपणे हा प्रकार पाहिला. तांत्रिकाच्या या संतापजनक कृत्यात महिलेच्या पतीचीही सहमती असल्याने विवाहितेने दोघांविरोधातही पोलिसात गुन्हा दाखल केला.


