फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन
चंदीगड : भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (91) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा अखेर संपला. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून 1958 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. 1959 साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.